सचिन मिटकर यांनी केली पीएच.डी पदवी संपादन
वागदरी (एस.के.गायकवाड):
वागदरी ता.तुळजापूर येथील सामान्य शेतकरी गणपत विश्वनाथ मिटकर यांचे चिरंजीव डॉ.सचिन गणपत मिटकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथून पीएच.डी.पदवी संपादन केली आहे.
सचिन मिटकर यांनी प्रतिकूल परिस्थितीतवर मात करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे वाणिज्य शाखेतून एका विषयावर शोध निबंध सादर केला होता.त्यामुळे त्यांना विद्यापीठाने पि एच.डी.पदवी प्रदान केली आहे.
परिस्थितीवर मात करून सचिन मिटकर यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे वागदरी ग्रामस्थांतून व मित्र परिवारातून आभिनंदन केले जाते आहे.