मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सोमवारी तुळजापूरात होणार जंगी स्वागत
तुळजापूर/नळदुर्ग,दि.०४
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात चाचपणी करण्यासाठी महाराष्ट्र दौरा करणार आहेत .नुकतेच त्यांनी 250 ठिकाणी उमेदवार उभे करण्याची तयारी असल्याचे सांगितल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात निरीक्षकांची टीम पाठवून आढावा घेतला. त्याच अनुषंगाने आता राज ठाकरे हे निरीक्षक व स्थानिक पदाधिका-यां सोबत चर्चा,आढावा व मार्गदर्शन करणार आहेत.
सोमवार दि.5 ऑगस्ट रोजी ते दुपारी 3 वाजता श्रीक्षेत्र तुळजापूर येथे दर्शन घेण्यासाठी येणार असून,त्यानंतर पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन धाराशिवकडे मार्गस्थ होवुन मुक्कामी राहणार आहेत. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघातील पदाधिका-यांना मार्गदर्शन मंगळवार दि. 6 ऑगस्ट रोजी धाराशिव येथे आयोजित केलेल्या बैठकीत करणार आहेत.त्यामुळे मनसेच्या सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव,जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे, तालुका सरचिटणीस गणेश पाटील,नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी मनविसे तालुकाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केले आहे.