माजी मंत्री मधुकरराव चव्हाण लढविणार विधानसभेची निवडणूक
अणदूर,दि. ४: श्रीकांत अणदुरकर
तूळजापूर तालुक्यातील अणदूर येथे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते म्हणाले विधानसभा निवडणुकीत सलग चार वेळा विजयी संपादन केला आहे.यावेळी 2024 ची विधानसभा निवडणुक कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी लढवणार आहे. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी विधानसभा आखाड्यात उतरणार असल्याचे दिले संकेत.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील अनेक गाव खेड्यातील वाडी वस्तीतील विकासात्मक कामे केली आहेत. तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हे माझे कुंटूब आहे.वयाच्या नव्वदाव्या वर्षी ही तोच जोश तोच उत्साह व सतत जनतेच्या संपर्कात असतो मी. निवडणूक हरल्या नंतर कधीच नाराज होऊन घरी बसलो नाही.सतत लोकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. पुढे बोलताना ते म्हणाले रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मतदारसंघातील आनेक गावात मजुरांना हाताला काम मिळून दिले.गाव तेथे पाझर तलाव त्यांच्या काळात करण्यात आले.या मुळे शेतकऱ्यांच्या जमीनी ओलीता खाली आल्या अनेक विकासात्मक कामे केली आहेत.गाव तेथे सभागृह बांधले .निराधारांना शासकीय योजनेतुन आधार देण्याचे काम केले. तेर ते गोरोबाकाका देवस्थानसाठी अडीच कोटीचा निधी उपलब्ध करून दिला.
तुळजापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा आजपर्यंत प्रामाणिक प्रयत्न केला पक्षाशी एक एकनिष्ठ राहिलो,अडचणीच्या काळात अनेक जण पक्ष सोडून गेले. पण मी मात्र जागेवर राहिलो. आज भारतीय जनता पक्षाच्या कारभाराला तालुक्यातील जनता वैतागली असून, लोकांना काँग्रेसचा विचार आता पटू लागला असून यावेळी मागील पराभवाचा वचपा काढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रामपंचायत सदस्य ते मंत्रालय असा प्रवास मी केला. पंचायत समिती उपसभापती ते विधानसभा उपाध्यक्ष ,मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे 2 वेळा अध्यक्षपद,असा माझा राजकीय प्रवास असल्याचे त्यांनी सांगितले.यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या मुळेच माझ्या सारख्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
मी पक्षश्रेष्टीकडे तुळजापूर विधानसभा निवडणुकीसाठी तिकिटाची मागणी केली आहे. तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी शेवटची निवडणूक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर लढविणार आहे असेही शेवटी ते म्हणाले.