नशामुक्त भारत करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा - मारुती बनसोडे
नळदुर्ग,दि.१२
सध्या युवा पिढी फार मोठया प्रमाणात व्यसनाधीन होत आहेअलिप्त राहून त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होताना दिसून येत आहेत. या व्यसनापासून युवकांनी नशामुक्त भारत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे धाराशिव जिल्हा संघटक तथा परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे यांनी केले आहे.
आज ते भैरवनाथ माध्यमिक विद्यालय चीकुंद्रा ता. तुळजापूर येथे आयोजित नशामुक्त भारत अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. समाज कल्याण अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद धाराशिव, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा धाराशिव, व परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक पवार होते. यावेळी गरड,गायकवाड सर, व विद्यालयातील विद्यार्थिनी, विदयार्थी मोठया संख्येनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचलन भैरवनाथ कानडे यांनी केले शेवटी व्यसन मुक्तीची शपथ विद्यार्थ्यांना देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. गरड यांनी सर्वांचे आभार मानले