चिवरी येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक
वागदरी , दि.२५
तुळजापूर तालुक्यातील मौजे चिवरी येथे डॉ.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेची गावातून सहवाद्द भव्यदिव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात काढून जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली.
यावेळी भिम-आण्णा सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिसे, तुळजापूर तालुका अध्यक्ष राम कांबळे, जयराज झोंबाडे, तुषार झोंबाडे,करण भिसे नागराज भिसे, विशाल शेंडगे सह पदाधिकारी यांनी साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.
याप्रसंगी डॉ.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कमिटी चिवरीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव व सर्व पदाधिकारी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.