वागदरी येथे श्रावण काला यात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न
वागदरी,दि.२५: (एस.के.गायकवाड):
तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथे श्रावण काला यात्रा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाली.
येथील ग्रामदैवत श्री संत सद्गुरू भवानसिंग महाराज यांच्या मूळे वागदरी गावाला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला असून गावाच्या जवळून वहाणाऱ्या ओढ्याच्या काठावर श्री संत भवानसिंग महाराज यांचे निसर्ग रम्य प्रशस्त मंदिर आहे. या मंदिरात प्रति वर्षा प्रमाणे येथील श्री संत भवानसिंग महाराज भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने पवित्र श्रावण महिन्यात श्री ज्ञानेश्वर महाराज पारायण सप्ताह साजरा करुन श्रावण काला यात्रा भरवून लाही फोडून या सप्ताहाची सांगता करण्यात आली.
या निमित्ताने वागदरी व परिसरातील टाळ मृदुंगासह वारकरी दिंड्या व भावीकभक्त या यात्रेत सहभागी झाले होते. वागदरी गावातील हणुमान मंदिरा समोरच मुख्य चौकात दिंडीच्या पाऊलाचे सादरीकरण करण्यात आले.दुपारी ठिक१.३० वा.दरम्यान दिंडीचे पाऊल खेळत रामकृष्ण हरी चा गरज करत टाळ मृदंगाच्या निनादात वारकरी दिंडीचे व भाविक भक्तांचे प्रस्थान श्री संत भवानसिंग महाराज मंदिर व चोखामेळा समाधीकडे झाले.त्या ठिकाणीही दिंडीचे पाऊल खेळून हरी भजना नंतर लाही फोडून या यात्रेची सांगता करण्यात आली.या निमित गावात व मंदिर परिसरात सर्वत्र आनंदी भक्तीमय वातावरणात निर्माण झाले होते.