रामतीर्थ येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

नळदुर्ग, दि.२५: 

 तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .

संत सेवालाल महाराज बंजारा लमाण  तांडा समृध्दी योजनेच्या सदस्यपदी संतोष चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल तर जळकोटचे सरपंच म्हणून गजेंद्र कदम यांची निवड झाल्याबद्दल व बालाघाट शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी सुभाष राठोड यांची निवड झाल्याबद्दल रामतीर्थ ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


यावेळी  लक्ष्मण राठोड, उपसरपंच तारु राठोड, माजी सरपंच दामाजी राठोड, बालाजी राठोड, शंकर राठोड, नामदेव पवार, धनाजी राठोड पोलीस पाटील,  नेमिनाथ चव्हाण, रामराव राठोड, सिताराम चव्हाण,मारुती राठोड , सतिश राठोड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी सुभाष राठोड, गजेंद्र कदम, संतोष चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक ग्रा.प.सदस्य शिवाजी राठोड यांनी केले तर आभार मुख्याध्यापक विनायक राठोड यांनी मानले.
 
Top