बदलापूर घटनेचा नळदुर्ग येथे रिपाइच्या वतीने जाहीर निषेध
नळदुर्ग,दि.२४ : एस.के.गायकवाड
बदलापूर जिल्हा ठाणे येथे एका ३ व एका ४ वर्षाच्या अल्पवयीन शालेय मुलींवर लैंगिक आत्याचार केल्याची निंदनीय घटना घडली असून या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) नळदुर्ग ता.तुळजापूर शहर शाखेच्या वतीने तिव्र निषेध करण्यात आला. आरोपीस त्वरित फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांना रिपाइं (आठवले) नळदुर्ग शहर शाखेच्या वतीने देण्यात आलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, दि.१३ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२४ प्रयत्न बदलापूर सह पुणे, अकोला, मुंबई, चांदिवली, लातूर,खारघर, कोल्हापूर आदी विविध ठिकाणी एकुण १० घटना ह्या महिला व लहान मुलीवर लैंगिक अत्याचारांच्या घटना घडल्या असून सदर महिला अत्याचारांच्या घटना ह्या निंदनीय असून पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या आहेत.या सर्व निंदनीय घटनांचा रिपाइच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून या निंदनीय घटनेतील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे .
निवेदनावर रिपाइंचे जिल्हा समन्वयक एस.के.गायकवाड, बाबासाहेब बनसोडे, अरुण लोखंडे, नळदुर्ग शहराध्यक्ष मारूती खारवे, राजेंद्र शिंदे, बाशिदभाई कुरेशी, शामकांत नागीले, सुरेश लोंढे, दत्ता बनसोडे,अमरदीप कांबळे,मोहन बनसोडे, अरविंद लोखंडे, प्रकाश गायकवाड,गोरख बनसोडे, दिलीप बनसोडे, विशाल मुकदान, दिपक मस्के, आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.