ॲड.धिरज पाटील यांच्या वतीने प्राथमिक शाळा वागदरी येथे शालेय साहित्याचे वाटप 


वागदरी(एस.के.गायकवाड)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी ता.तुळजापूर येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप  करण्यात आले. प.पू.स्व.माणिकराव कदम पाटील चॅरिटेबल ट्रस्ट तुळजापूर चे संस्थापक अध्यक्ष , विद्यमान जि.प.सदस्य ॲड.धिरज आप्पासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे‌ अध्यक्ष महादेव वाघमारे,ग्रा.प.सदस्य अमोल पवार, सामाजिक कार्यकर्ते एस.के.गायकवाड, प्रमोद बिराजदार,भरतसिंग ठाकूर, सुर्यकांत वाघमारे, शाळेच्या मुख्याध्यापिका महादेवी जत्ते, सहशिक्षक तानाजी लोहार, ज्ञानेश्वर बाबर, सहशिक्षका मनिषा चौधरी, रेखा साखरे, संपदा माडजे आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.
 
Top