महाविद्यालयीन युवकांनी नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करणे गरजेचे-राहुल गिरी
नळदुर्ग, दि.२४ :डॉ. दिपक जगदाळे
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथे आज "महाविद्यालयीन युवकांची पाणी बचत संदर्भात भूमिका यावर आधारित एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
मागील एक वर्षभरामध्ये ग्रीन क्लब मध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना "ग्रीन इनथुसिस्ट' नावाचे प्रमाणपत्रही देण्यात आले. या कार्यक्रमासाठी शासनाचे प्रतिनिधी आणि युनिसेफ,वाय डब्ल्यू एस आणि एक्वाडॅमचे समन्वयक राहुल गिरी आणि परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुभाष राठोड, आय क्यू एसीचे समन्वयक प्रा. शिवाजी घोडके आदीनी रोपट्याला पाणी घालून केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक,पाहुण्यांचा परिचय आणि 2023-24 दरम्यान ग्रीन क्लबच्या वतीने केलेल्या कार्याचा आढावा पावर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून महाविद्यालयातील ग्रीन क्लबचे समन्वयक प्रा डॉ उद्धव भाले यांनी मांडला.त्यानंतर मागील वर्षी ग्रीन क्लब मध्ये सक्रिय असणाऱ्या विद्यार्थ्यांना युनिसेफद्वारे दिलेल्या प्रमाणपत्राचे वाटप मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर यावर्षीसाठी निवड झालेल्या ग्रीन क्लब समितीतील विद्यार्थ्यांना मान्यवरच्या हस्ते नियुक्ती पत्रही देण्यात आले. ग्रीन क्लब युवा अध्यक्षा कु र्किती इटकरी हिने पाण्याचे महत्त्व याविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच ग्रीन क्लबमधील सक्रिय विद्यार्थी समर्थ लोंढे यानी पाणीबचत यावर कविता सादर केली.त्याचबरोबर मागील वर्षी ग्रीन क्लबमध्ये सक्रिय असणारे परंतु तृतीय वर्ष पास झालेले विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
मारुती बनसोडे यांनी पाण्याचे स्त्रोत आणि पातळी दिवसेंदिवस कमी होत असल्याने युवकांमार्फत पाणी बचतीसाठी जनजागृती होने गरजेचे आणि महाविद्यालयीन युवकांनी जर पुढाकार घेतला तर हे काम अशक्य नाही असे सांगितले. शासनाचे प्रतिनिधी आणि युनिसेफ वाई डब्ल्यू एस आणि ऍक्वॅडमचे मराठवाडा विभागाचे समन्वयक राहुल गिरी यांनी महाविदयालयीन युवकांनी नैसर्गिक संसाधनाची संवर्धन आणि पाणी बचत करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले.त्याचबरोबर येत्या काळामध्ये या ग्रीन क्लबच्या कार्याची दखल शासनाने घेऊन नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हा विषय अनिवार्य करून त्याला दोन किंवा तीन क्रेडिट पेक्षा जास्त महत्व येऊ शकेल आणि किमान दोन वर्ष ग्रीन क्लब मध्ये सक्रिय काम केल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना ग्रीन जॉबच्या संधी उपलब्ध होऊ शकतील अशी माहिती दिली. ग्रीन क्लब मधील केलेल्या कामाचे कौतुकही केले. सूत्रसंचालन ग्रीन क्लबचे सहसमन्वयक प्रा डॉ. निलेश शेरे तर आभार सहसमन्वयक प्रा डॉ हंसराज जाधव यांनी मानले.
पाणी वापर आणि बचत अनुषंगाने सर्वांनी प्रतिज्ञा घेतली. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा डॉ उद्धव भाले, निलेश शेरे , डॉ हंसराज जाधव, बारीक शिंदे संशोधक विद्यार्थी किरण व्हंताळकर , कु निकिता कांबळे, अमर वाघोले आणि ग्रीन क्लब मधील पदाधिकारीनी परिश्रम घेतले.