विलास राठोड यांची धाराशिव जिल्हा तांडा सुधार समितीवर सदस्यपदी निवड
नळदुर्ग,दि. २३
शासनाच्या संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनांतर्गत समितीवर अशासकीय सदस्य म्हणून राष्ट्रीय बंजारा परिषदेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष तथा भाजपचे तालुका सरचिटणिस विलास राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे सर्वत्र स्वागत करुन राठोड यांचे अभिनंदन केले जात आहे.
आलियाबाद ता. तुळजापूर येथील विलास राठोड यांची महाराष्ट्र शासनाच्या संत सेवालाल महाराज (बंजारा) तांडा समृद्धी योजनेसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून विलास राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विलास राठोड यांनी दिलासा फाऊंडेशनचे समन्वयक म्हणून काम पाहात असुन तुळजापूर तालुक्यातील अनेक गावात लोकपयोगी उपक्रम राबविले आहे, ते नेहमीच सामाजिक कार्यात भाग घेतात. गेल्या अनेक वर्षापासुन ग्रामीण भाग व वाड्या, तांड्यावर राठोड यांचे कौतुकास्पद कार्य आहे. त्याचबरोबर आलियाबाद ग्रामपंचायत सदस्य म्हणुनही त्यानी उल्लेखनीय काम केल्याचे सर्वश्रुत आहे.
राठोड यांच्या निवडीबद्दल तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, लोकसभा प्रमुख नितीन काळे, तुळजापूर तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, जिल्हा भाजपचे महामंत्री दीपक आलूरे, इंद्रजित देवकते, रामचंद्र कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अस्मिता कांबळे, वसंत वडगावे, विजय शिंगाडे, गुलचंद व्यवहारे, विद्यानंद राठोड, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा नंदाताई पुनगुडे, तुळजापूर विधानसभा प्रमुख विक्रमसिंह देशमुख, माजी जि.प.सदस्य गणेश सोनटक्के, नळदुर्ग शहराध्यक्ष धिमाजी घुगे, भाजप युवा मोर्चा जिल्हा सचिव श्रमिक पोतदार, पत्रकार शिवाजी, नाईक, अरविंद पाटील, वसंत पवार, दामाजी राठोड, किरण राठोड यांच्यासह राजकीय , सामाजिक , बंजारा समाजातील प्रमुख मान्यवरानी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.