गुजनूर येथे विविध ठिकाणी साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन
वागदरी(एस.के.गायकवाड):
जगद्विख्यात साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तुळजापूर तालुक्यातील मौजे गुजनूर येथे विविध ठिकाणी अभिवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
येथील साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे नगरातील समाज मंदिर येथे मातंग समाज बांधवांच्या वतीने लोकशाहीर डॉ.आण्णभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी सरपंच फुलचंद वाघमारे व उपसरपंच व्यंकट साळुंखे यांच्या हस्ते आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात करून उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन केले तर येथील जि.प.प्राथमिक शाळेत ही आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ,सरपंच,
उपसपंच,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिज्क्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते.तसेच येथील ग्रामपंचायत कार्यालयात ही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी सरपंच फुलचंद वाघमारे, उपसरपंच व्यंकट साळुंखे यांच्या हस्ते आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी माजी सरपंच भास्कर नागमोडे, ग्रामसेवक पी.पी.कुंभार, सामाजिक कार्यकर्ते हरीशकुमार पाटील, शेषराव साळुंखे, माजी सरपंच अण्णाप्पा मुलगे, पांडुरंग नागमोडे, महादेव मोरे महाराज,राहुल वाघमारे, पांडुरंग वाघमारे,सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.