नळदुर्ग: महाराष्ट्र ग्रामीण बँकेची फोन पे, गुगल पे सेवा चार पाच दिवसांपासून बंद : याकडे कोणी लक्ष देईल का..?
वागदरी(एस.के.गायकवाड)
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग,वागदरी व परिसरातील महाराष्ट्र ग्रामीण बँक ची फोन पे व गुगल पे सेवा गेल्या चार पाच दिवसांपासून बंद पडल्याने आर्थिक व्यवहाराची फार मोठी कोंडी झाली आहे.या कडे कोण लक्ष देईल का? यांची तक्रार नेमकी कोणाकडे करायची ही सेवा म्हणजे ना धनी ना गोसावी या प्रमाणे झाली आहे.त्यामुळे ग्राहकांकडून या बाबत संताप व्यक्त केला जात आहे.
डिजिटल इंडिया च्या नावाखाली सर्व बॅंक खाते पॅनकार्ड मोबाईल नंबर आधार कार्ड सी जोडून फोन पे गुगल पे वगैरे द्वारे आॅन लाईन आर्थिक व्यवहाराची शक्ती शासन करते यामुळे ग्रहाकानी या सेवेचा लाभ घेण्यासाठी लाखो ग्राहकांनी फोन पे गुगल पे सेवा सुरू केली.ग्रहाकांच्या दृष्टीने कुठे ही केंव्हा ही खरेदी विक्री चा आर्थिक व्यवहार असेल किंवा वैयक्तिक आर्थिक देवाणघेवाण असेल किंवा बस प्रवास भाडे असेल आदी आर्थिक व्यवहार फोन पे गुगल पे द्वारे करताना ग्राहकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. ग्राहकांना आता फोन पे व गुगल पे द्वारे आर्थिक व्यवहार करण्याची सवय झाली आहे.परंतू गेल्या चार पाच दिवसांपासून महाराष्ट्र ग्रामीण बँक ची सदर फोन पे गुगल पे सेवा ठप्प झाल्याने आर्थिक व्यवहाराची फार मोठी कोंडी झाली आहे.तरी संबंधितांनी याकडे लक्ष देवून लवकरात लवकर सदर सेवा सुरू करावी असी मागणी ग्राहकांतून होते आहे.