येडोळा येथे २५१ महिला लाभार्थीचे माजी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज आँन लाईन दाखल
वागदरी (एस.के.गायकवाड):
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी तुळजापूर तालुक्यातील येडोळा येथे तब्बल २५१ महिला लाभार्थी चे अर्ज आॅन लाईन दाखल झालेले आहेत असी माहिती येथील विद्यामान सरपंच झिमाबाई रामसिंग जाधव यांनी दिली आहे.
ग्रामीण भागात सतत सर्वर डॉऊनची समस्या निर्माण होत असताना देखील येडोळा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका एस.एन.गोरे,संगणक परिचारक अमित लोंढे, अंगणवाडी कार्यकर्ती शितल लोंढे, सुवर्णा लोंढे, सुमन राठोड,ग्रा.प.शिपाई माणिक कांबळे, सामाजिक कार्यकर्ते नागेश लोंढे, तानाजी चव्हाण ,आशा कार्यकर्ती नैना कांबळे, कविता जाधव आदींच्या प्रयत्नातून येडोळा व येडोळा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या तांड्यातील मिळून २५१ महिला लाभार्थी यांचे आॅन लाईन अर्ज दाखल करण्यात आले आहेत.