विद्यापिठाकडुन उत्कृष्ठ क्रीडा महाविद्यालय म्हणुन नळदुर्ग महाविद्यालयाचा गौरव
नळदुर्ग , दि.३० प्रा. दिपक जगदाळे
येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय म्हणुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठ छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य नाट्यगृहात पार पडलेल्या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. विजय फुलारी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सहाय्यक संचालिका भाग्यश्री बिले यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी व्यासपिठावर प्र. कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, शारीरीक शिक्षण विभागप्रमुख डॉ. कल्पना झरीकर, विद्यापिठ क्रीडा प्रमुख डॉ. संदीप जगताप उपस्तिथ होते.
शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ पासून विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांनी आंतर-महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा, पश्चिम विभागीय व अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा, खेलो इंडिया आंतर-विद्यापीठ क्रीडा स्पर्धा, जागतिक आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा तसेच क्रीडा महोत्सव स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडूंच्या संख्येच्या आधारावर तसेच इतर आवश्यक बाबींची शहानिशा करुन गुणांकन देवून, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व धाराशिव जिल्हयातून एक शहर व एक ग्रामीण अशा उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालयाची निवड करुन गौरविले आहे. हा पुरस्कार प्राचार्य डॉ. सुभाष राठोड, क्रिडा शिक्षक प्रा. अशोक कांबळे, डॉ. कपिल सोनटक्के यानी स्विकारला.
नळदुर्ग महाविद्यालयाला एकुण ७५ गुणांकन प्राप्त झाले आहे.
विद्यापिठाच्या क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाचा दबदबा कायम ठेवण्यात महाविद्यालय पुन्हा एकदा यशस्वी ठरले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व खेळाडुचे व मार्गदर्शकाचे संस्थेचे अध्यक्ष मधुकररावजी चव्हाण, सचिव उल्हास बोरगांवकर, कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे, संचालक बाबुराव चव्हाण सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. सुभाष राठोड कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.