विविध मागण्यासाठी नळदुर्ग नगरपरिषद कर्मचारी बेमुदत संपावर
नळदुर्ग,दि.२९ :
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग आधिकारी संघटनेच्या
विविध मागण्यासाठी मुख्यत्वे जुनी पेन्शन मंजूर करण्यासाठी बेमुदत संप गुरुवार दि. २९ आँगस्ट रोजी पुकारण्यात आला असुन या संपात नळदुर्ग न.प.चे कर्मचारी सहभागी झाले आहे.
जुनी पेन्शन मिळनेबाबत,आश्वासित प्रगती योजना लागू करणे(10,20 व 30),सहायक अनुदान 1महिना आगाऊ देणे, 7वा वेतन व महागाई फरक अनुदान मिळणे बाबत,सफाई कामगारांना (हक्काची) घरे मिळणे बाबत, वेतन लेख कोषागार मार्फत देणेबाबत, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे बाबत, न. प कर्मचाऱ्यांना स्वतंत्र परीक्षा अथवा ज्येष्ठतेने भरण्यात यावी, संवर्ग सर्वसाधारण बदल्यामधील जाचक अटी रद्द करण्यात यावे, न. प पदाचे 7 वा वेतन आयोग अधिसूचनेत समावेश करणे बाबत,मुख्याधिकारी पदावर 60 टक्के न. प संवर्ग कर्मच्याऱ्यातून भरण्यात यावे,संवर्ग श्रेणी अ पदास राजपत्रित गट ब व श्रेणी ब पदास अराजपत्रित गट ब लागू करणे आदी मागण्यासाठी न.प. कर्मचारी बेमुदत संपावर आहेत.
नळदुर्ग न.प. चे कार्यालयीन अधिक्षक अजय काकडे, नगर अभियंता वैभव चिंचोळे,पाणीपुरवठा अभियंता श्रीमती दिक्षा सिरसट, नामांतर विभागाचे रोमन राजेंद्र ,शेख खलील,तानाजी गायकवाड, जागीरदार दस्तगीर, खंदारे व्ही व्ही,सतीश आखाडे,ज्योती बचाटे,आनंद खारवे,अण्णाराव जाधव,भीमसेन भोसले,प्रवीण चव्हाण, नितीन पवार,नवनाथ होनराव,शहाजी येडगे,फुलचंद सुरवसे, एम जी भूमकर, के एन नागणे, सुशांत डुकरे, चंद्रकांत जाधव,सपकाळ रानुबाई यांच्यासह न.प. कर्मचारी सहभागी झाले होते.