मलिन्नाथ ऊर्फ अर्जुन  धुमाळ यांचे उपचारा दरम्यान निधन 

वागदरी, दि.३१

वागदरी ता. तुळजापूर येथील प्रगतशील  बागायतदार शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते मलिन्नाथ (अर्जुन) आनंद धुमाळ वय ४५,  यांचे शुक्रवारी दि.३० आँगस्ट २०२४ रोजी दुपारी  ३. वाजता अल्पशा आजाराने  निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी दोन मुले भावंडे असा  परिवार आहे.

कै.अर्जुन धुमाळ यांचा धाराशिव, लातूर, सोलापूर, जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाणी दाखवून त्यांना  बागायतदार बनविणारा पाणीदार माणूस म्हणून  नावलौकिक होता. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते.उपचारा दरम्यान त्यांचा  शुक्रवारी  दुपारी  ३ वाजता  त्यांचे  निधन झाले.
शनिवार  दि. ३१ रोजी सकाळी 11 वाजता  वागदरी येथे  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
 
Top