नळदुर्ग : श्री संत सेना महाराज  पुण्यतिथी  उत्साहात साजरी 

नळदुर्ग, दि.३०

 शहरामध्ये   श्री संत सेना महाराज नाभिक समाज मंडळाच्या वतीने संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

 दि. 29 रोजी सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून धन निरंकार यांचे सत्संग व नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा  सत्कार  राष्टवादीचे नेते अशोक  जगदाळे,  माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण, संजय बताले  सरदारसिंग  ठाकूर ,संतोष पुदाले ,शिवाजी वऱ्हाडे आदीच्या  हस्ते  करण्यात  आले. दि. 30 रोजी युवा किर्तनकार हभप कु. तेजश्रीताई खटके यांचे काल्याचे कीर्तन  झाले.  त्यानंतर  आकाश मेंडके , संजय पवार यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी नाभिक समाजाचे अध्यक्ष संदीप सुरवसे, सचिव महादेव माने, उपाध्यक्ष नेताजी महाबोले, दुकानदार संघटनेचे अध्यक्ष नागनाथ वाळके, उपाध्यक्ष मंदार महाबोले, गोवर्धन आतकरे, उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष महाबोले व नाभिक समाजातील  युवक कार्यकर्त्यांनी  पुढाकार घेतले.
 
Top