टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या
विद्यार्थ्यांची नळदुर्ग महाविद्यालयास अभ्यास भेट
नळदुर्ग, दि.३०
कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथील राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथील राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांची अभ्यास भेट घेतली.
या कार्यक्रमांमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथील डॉ. आशिष नवनीत यांनी अभ्यास भेटीच्या पाठीमागचा उद्देश विद्यार्थ्यांना सांगितला. त्यानंतर डॉ.निलेश शेरे यांनी अशा अभ्यास भेटी मधून विचारांची देवाण-घेवाण होते आणि यातूनच विद्यार्थी प्रगल्भ होतो. तसेच या अभ्यास गटामध्ये उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान दिल्ली, केरळ या राज्यातील विद्यार्थ्यांशी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वैचारिक संवाद करता आला त्यामुळे निश्चितच याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना होईल असे मत व्यक्त केले. यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले व विद्यार्थ्यांनी विविध विषयावर चर्चा केली.
महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी अभ्यास गटाचे प्रमुख डॉ. आशिष नवनीत व त्यांच्यासोबत आलेले सर्व विद्यार्थी यांचा सत्कार केला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. बालाजी क्षिरसागर, प्रा. राजेंद्र म्हमाने, रमेश सर्जे यांनी पुढाकार घेतले.