कारागृहातील कैद्यांना राखी बांधणे हा कौतुकास्पद उपक्रम- उमाकांत मिटकर
वात्सल्य संस्था व विधी कॉलेजचा पुढाकार

धाराशिव, दि.१९

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीची उणीव भरून काढण्यासाठी डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय व वात्सल्य सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कारागृह प्रशासनाच्या मदतीने कैद्यांना राखी बांधणे हा कौतुकास्पद उपक्रम आहे.असे राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक  सदस्य श्री.उमाकांत मिटकर यांनी म्हटले.

प्रारंभी कारागृह प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कारागृह अधीक्षक श्री.दिगंबर इगवे यांनी कारागृहातील प्रशासनाची माहिती दिली.यावेळी बोलताना श्री.मिटकर म्हणाले की भाऊ बहिणीच्या पवित्र आणि निस्वार्थी प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन.आपल्या संस्कृतीत याला मोठे महत्त्व आहे.या दिवशी बहिण भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याच्या मनगटावर राखी बांधते ओवाळते आणि त्याच्या समृद्ध निरोगी जीवनासाठी प्रार्थना करते पण आपल्या समाजातील काही व्यक्ती केलेल्या चुकीमुळे कारागृहात शिक्षा भोगत आहेत. या कैद्यांचे विश्वच वेगळे असते हा उपक्रम सामाजिक संदेश देणारा आहे.

प्रा.श्री.नितीन कुंभार यांनी या कार्यक्रमा मागील उद्देश सांगितला की,लॉ कॉलेजच्या मुलांना कारागृहाची माहिती व्हावी, सामाजिक जाणीवा निर्माण व्हाव्यात ,मोबाईलच्या युगात नष्ट होत असलेले नाते जपावे तसेच भविष्यात असे अनेक उपक्रम घेण्याची खात्री दिली.

सदरील कार्यक्रमास प्रा. इकबाल शहा श्री.नितीन सरवदे, लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनी-विद्यार्थी,तुरुंग प्रशासनाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुरूंगाधिकारी श्री.कृष्णा चौधरी यांनी केले आभार प्रा.श्री कुंभार यांनी मानले

विद्यार्थिनी मनोगत - कु.ईश्वरी चुंबळकर

 या बांधवांना राखी बांधताना मन भरून आले.मी आयुष्यात पहिल्यांदाच जेल पाहिला.या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपण्याची मला संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल वात्सल्य संस्थेचे व लॉ कॉलेजचे खूप खूप आभार
 
Top