न्यू चैतन्य तरुण गणेश मंडळाची कार्यकारणी जाहीर
नळदुर्ग, दि.२०
न्यू चैतन्य तरुण गणेश मंडळ,शनिवारवाडा,ब्राह्मण गल्ली येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा होणार असून,मंडळाचे आधारस्तंभ शरद बागल,दिलीपराव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी गठीत करण्यात आली.
यामध्ये अध्यक्षपदी उमेश अवचार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष शशांक खैनमाडे/संकेत कसेकर,कोषाध्यक्ष सागर थोंटे/सोहम बेले,सचिव अभि स्वामी,सह•सचिव आकाश मदने,लेझीम प्रमुख अजय मोरे,मिरवणूक प्रमुख अमित शेंडगे,प्रविण चव्हाण,प्रमोद कुलकर्णी,कैलास घाटे,अंबादास पवार,आकाश कुलकर्णी,गणेश शेंडगे,अजित दोपारे,अंकुश जाधव आदीची निवड करण्यात आली.