दहिटणा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
वागदरी, दि. २१
धाराशिव जिल्ह्यातील मौजे दहिटणा ता.तुळजापूर येथील इंदिरा नगर येथे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले.
दहिटणा येथे झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण व नविन मंजूर करण्यात आलेल्या डॉबाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन समारंभ कार्यक्रमाचे आयोजन येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच शिवकांताताई कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून आमदार पाटील यांच्या हस्ते सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना आ. राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहिण योजने संदर्भात विरोधकांच्या टिकेकडे लक्ष न देता सर्व जाती धर्मातील महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा.तसेच तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आगामी काळात विकास निधी कमी पडू देणार नाही.तसेच शेतकरी, महिला, युवकांनीही वैयक्तीक पातळीवरच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे आले पाहिजे.त्यानाही सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला जाईल.
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष बोबडे,अॅड.दिपक आलुरे,भिवा इंगोले, विवेकानंद मिलगीरे, किशोर धुमाळ, किशोर सुरवसे, रामसिंग परिहार, रिपाइं (आठवले)चेजिल्हा समन्वयक एस.के.गायकवाड, तालुका संघटक सुरेश लोंढे , गुजनूरचे सरपंच फुलचंद वाघमारे, दहिटणा येथील भाजपाचे कल्याण बिराजदार, शंकर चव्हाण, आप्पासाहेब बिराजदार, राजेंद्र नागरसे, नागनाथ कदम, रोहित नांगरे, प्रविण बिराजदार, राहुल गड्डे, दत्ता कुंभार, प्रशांत पाटील,सिध्दराम पाटील, सागर सूरवसे,उमेश कांबळे,भरत वाघमारे, परमेश्वर कांबळे , सखाराम गायकवाड,उत्तम कांबळे,राम कांबळे, शंकर कांबळे, केरनात वाघमारे,परमेश्वर सुरवसे अर्जुन सुरवसे, श्रीशैल कांबळे,वसंत कांबळे ग्रा.प. सदस्य बाबू वाघमारे,संतराम वाघमारे, सोपान कांबळे, उद्धव वाघमारे,भास्कर बनसोडे, संजय बनसोडे उमेश कांबळे,अरविंद वाघमारे, संतोष बनसोडे स्वामीनाथ बनसोडे दिनकर बागडे शहाजी कांबळे,प्रकाश सुरवसे,नागीनीताई सुरवसेसह ग्रामस्थ महिला युवा कार्यकर्ते उपस्थित होते.