तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत वैभवी पिसेचे घवघवीत यश 

वागदरी, दि.१३ एस.के.गायकवाड

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हा परिषद प्रशालेची विद्यार्थिनी वैभवी विजय पिसे इयत्ता आठवी हिने घवघवीत यश संपादन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.

दिनांक ८-८-२०२४ रोजी झालेल्या शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन श्री श्री रविशंकर विद्यामंदिर  अणदुर येथे करण्यात आले होते. यामध्ये तुळजापूर तालुक्यातील २५ शाळेतील इच्छुक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये १७ वर्षीय वयोगटातील मुले व मुली यांनी आपल्या सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये १७ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये जिल्हा परिषद प्रशाला जळकोटची विद्यार्थिनी वैभवी विजय पिसे हिने घवघवीत संपादन केल्याने होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत तिची निवड झालेली आहे . या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समिती, शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप तरमोडे , संतोष सारणे , समाधान पवार , जे. बी. शिंदे, गोपाळ बनपट्टे  यांचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल  तिचे  अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
 
Top