कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी रोहित लिंबराज मोटे यांचे यश

नळदुर्ग ,दि.०८: प्रा. दिपक जगदाळे 

 नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी रोहित लिंबराज मोटे याने महाराष्ट्र राज्याच्या प्राध्यापक पात्रता परीक्षा ( सेट ) परीक्षेत यश संपादन केल्यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 


एप्रिल २०२४ मध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ,पुणे अंतर्गत झालेली पदार्थ विज्ञान ( physics ) या विषयाची सेट ची परीक्षा रोहित मोटे याने दिली होती त्याचा काल निकाल लागला त्यामध्ये रोहित मोटे हा उत्तीर्ण झाला. त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील फिजिक्स विभागाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ. रोहिणी महिंद्रकार, प्रा.प्रशांत अमृतराव, प्रा.नेताजी जाधव, प्रा. हणमंत पाटील, प्रा. धनंजय पाटील, डॉ. दिपक जगदाळे, प्रा. नेताजी बिराजदार, प्रा. बाबासाहेब सूर्यवंशी , प्रा. किरण भोसले , श्री. काशिनाथ कोळी आदिजन उपस्थित होते.
 
Top