चैतन्य मूक बधिर शाळेतील विद्यार्थीनीना नागपंचमी सणानिमित्त सौदर्य प्रसादन साहित्य वाटप
नळदुर्ग,दि.०८
माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या वतीने प्रतीवर्षाप्रमाणे चैतन्य मूक बधिर शाळेतील विद्यार्थीनीना नागपंचमी सणा निमित्त सौदर्यप्रसादनाचे साहित्य वाटप करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून विनायक अहंकारी हे नागपंचमी सणानिमित्त हा उपक्रम राबवत आहेत. अहंकारी यांचे व या मूक बधिर शाळेतील विद्यार्थ्यांचे एक प्रेमळ संबंध निर्माण झाले आहेत.ते कायम या मुलासोबत जोडले गेलेले असुन नागपंचमीचा सण ,राखीपौर्णिमा, भाऊबीज आणि रंगपंचमी हे सगळे सण विनायक अहंकारी हे या मूक बधिर शाळेतील मुलांसमवेत साजरा करतात.
रंगपंचमीला तर सर्वजण मिळून रंग लावून नृत्य करतात.
अहंकारी यांच्यामुळे अनेक सामाजिक कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी होत आहेत. निसर्गाने ज्यांना शारीरिक कमतरता दिली. त्यांना मानसिक आनंद देण्याचं खुप मोठ काम नळदुर्गचे माजी नगरसेवक विनायक अहंकारी करतात.