नळदुर्ग येथे महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
वागदरी, दि.०९: एस.के.गायकवाड
महामार्ग पोलीस केंद्र नळदुर्ग येथे महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले.
आरोग्य हीच खरी संपत्ती असून आपले आरोग्य चांगले तर सर्वकाही चांगले काम करता येते तेंव्हा आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे.ही खरी गरज ओळखून महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
या प्रसंगी जि.प.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.एस.कदम,नेत्र चिकित्सा सहाय्यक आनंद काटकर, आरोग्य कर्मचारी रमेश शियाले आदीनी यावेळी उपस्थित सर्व महामार्ग पोलीस पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली.
यावेळी पोलीस हवालदार रत्नदीप कदम, पो.काॅ.बालाजी बेगडे,राजू चव्हाण, सुर्यकांत गायकवाड, गणेश अतकरे, पंडित शिंदे,जमीर पठाण, पत्रकार ईरफान काझी,एस.के.गायकवाड, किशोर धुमाळ, सुरेश लोंढे, ववाहन चालक आर.एन.पवार आदीसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.