शासनाच्या सारथी शिष्यवृती प्राप्त मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा शिवम् कॉम्प्युटरच्यावतीने गौरव
नळदुर्ग ,दि. ६: प्रा. दिपक जगदाळे
येथील शिवम् कॉम्प्युटर एज्युकेशन मधील शासनाच्या सारथी शिष्यवृती प्राफ्त मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिप प्रज्वलन करुन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष शशीकांत पुदाले तर प्रमुख पाहूणे म्हणुन बालाघाट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड हे उपस्थित होते. उपस्थिताचा सत्कार शिवम कॉम्प्युटरचे संचालक सतिश पुदाले यांनी केला .
शिवम् कॉम्प्युटर एज्युकेशनमध्ये शासनामार्फत सारथी नावाचा एक उपक्रम राबविला जातो, ज्यामध्ये मराठा समाजातील युवांना वीस ते पंचवीस हजाराचे कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्स अगदी मोफत आहेत. त्या कोर्ससाठी निवड झालेले विद्यार्थी कु.आदिती भागवत बेले , कु. तृप्ती मल्लिकार्जुन गायकवाड , कु. आकांक्षा अवधूत चव्हाण , कु.शुभांगी भास्कर गायकवाड , कु.सोनाली रमेश जाधव, कु. तन्वी लक्ष्मण कदम या विद्यार्थ्यांची कोर्स चालू करत असताना त्याच्या कडून घेतलेली सुरक्षा रक्कम दोन हजार रुपये परत करण्याचा तसेच कु. अदिती बेले, कु. सोनाली जाधव , कु. संगीता मोटे, कु. तन्वी कदम यांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. सानिका संतोष महाबोले हिने केले तर उपस्थितांचे आभार कु. पूनम जयसिंग बिसेनी हिने मानले.