पुरातत्व विभागाच्या सहाय्यक  संचालिका जया घोळवे - वहाणे यांची नळदुर्ग भुईकोट किल्ल्यास  भेट 

नळदुर्ग, दि.६ :

छत्रपती संभाजी नगर पुरातत्व विभागाच्या सहाय्यक  संचालिका जया घोळवे - वहाणे यांनी पहिल्यादाच  नळदुर्ग भुईकोट किल्ल्यास सोमवार  रोजी भेट देवुन पाहणी केली.

हा  किल्ला महाराष्ट्र शासनाच्या वैभव संगोपन योजनेअंतर्गत सन २०१४ मध्ये करारान्वये सोलापूर येथील युनिटी मल्टिकाॕन्स प्रा. लि. या कंपनीस दहा वर्षासाठी संगोपनार्थ दिला होता.   हा कालावधी  पूर्ण होवून १ आॕगष्टपासून किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात आल्यानंतर पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर विभागाच्या सहसंचालक जया घोळवे वहाणे यांनी भेट देत पाहणी केली. सुमारे एकशे पंचवीस एकरातील आवाढव्य किल्ला परिसरात केलेल्या सुधारणा, झालेला बदल पाहून त्या आनंदी झाल्या. 

किल्ला आणि पर्यटक हे आमच्यासाठी महत्वाचे आहेत. पर्यटकांच्या सोयीसुविधासाठी व येथील नागरिकांना रोजगार मिळत असल्यामुळे काही सेवा सुरू 
ठेवण्यास सांगितले आहे.  

युनिटी मल्टिकाॕन्स कंपनीने भविष्यात संगोपनाची जबाबदारी द्यावी असा प्रस्ताव आमच्याकडे दिला आहे व त्यांच्याबाबत मीही सकारात्मक आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. व त्याबाबत आमच्या  वरिष्ठ मुंबई कार्यालयाकडे प्रस्ताव देणार असल्याचे जया घोळवे यांनी सांगितले. किल्ल्यात राहणाऱ्या नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला.


यावेळी युनिटी मल्टिकाॕन्सचे कार्यकारी संचालक कफील मौलवी, युनिटीचे जनसंपर्क अधिकारी विनायक अहंकारी, पुरातत्व खात्याचे किल्लेदार नागनाथ गवळी, रितेश कांबळे, आकाश बोकडे, प्रणाल गवळी यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते.

नळदुर्ग - नळदुर्ग भुईकोट किल्ल्याची पाहणी करताना पुरातत्व विभागाच्या सहसंचालक जया घोळवे- वहाणे, युनिटीचे कफील मौलवी आदी
 
Top