१२५ पानी नियोजित नळदुर्ग तालुक्याचा अहवाल मनसे टीमने दिले राज ठाकरेना
धाराशिव/नळदुर्ग,दि.०६
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे धाराशिव येथे विधानसभा निवडणुकी संदर्भात चाचपणी करण्यासाठी व पदाधिका-यांना मार्गदर्शक करण्यासाठी आले असताना नळदुर्ग मनसेचे पदाधिका-यांना आवर्जून भेटीसाठी त्यांनी बोलावलं, यावेळी मनसेचे शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांनी " नियोजित नळदुर्ग तालुका" होण्यासाठी पक्षाच्या वतीने वेळोवेळी आवाज उठवला व शासनाकडे 125 पानी अहवाल दिला असून,वर्षभरापूर्वी शासनाने कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नवीन तालुके निर्मितीसाठी समिती गठीत केली आहे,त्या समितीची भेट घेऊन हि निवेदन व अहवाल दिल्याचे सांगितले,
गेल्या 40 वर्षांपासूनची नळदुर्ग तालुक्याची मागणी असून,अप्पर तहसील कार्यालय निर्मितीचा विषय सुद्धा बाजूला पडल्याचे सांगितले,यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी व संबंधिताशी बोलू असे पदाधिका-यांना आश्वासित केले आहे,यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव,जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे,तालुका सरचिटणीस गणेश पाटील,नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,मनविसे तालुकाध्यक्ष सूरज चव्हाण,गणेश बिराजदार,सोमेश्वर आलूरे उपस्थित होते.