मुरूम शहरात भीषण आग,सहा दुकाने जळून खाक,लाखोंचे नुकसान,जीवित हानी नाही


मुरूम दि.०७, 

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बस स्टँड समोरील दुकानाना पहाटे ३.४५ ते ४ च्या दरम्यान शॉट सर्किट मुळे भीषण आग लागून सहा दुकाने जळून खाक झाली आहेत. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र लाखोंचे नुकसान झाली असल्याचे प्राथमिक अंदाज आहे.


 शहरातील मुख्य चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकात बस स्टँड समोर छोटेकानी दुकानाच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबावर मात्र मोठे संकट आले आहे. दोन हॉटेल साम्राज्य चहा, कुबेर फायनान्स,बाळराजे मोबाईल,स्वीट मार्ट असे सहा दुकाने जळून खाक झाली आहेत तर जाधव यांच्या दुकानाच्या दुसऱ्या माळ्यावर आग लागून नुकसान झाले आहे. एकंदिरत विधुत शॉर्ट सर्किट मुळे आग लागली त्यामुळे हॉटेल मधील गॅस टाक्याचा स्फोट झाल्याने मोठा आवाज झाला, त्याचबरोबर मोबाईल दुकानातील बॅटरी, मोबाईल्स, हॉटेलातील फर्निचर, बेकरीतील फर्निचर,फ्रिजर मुळे आगीने रुद्ररूप धारण केले होते. जेसीबीच्या साह्याने काही शटर बाजूला काढण्यात आले. मुरूम नगर परिषद अग्निशमन गाडीच्या दोन फेऱ्यात आग विजवण्यास यश आले आहे.रसिका पेट्रोल पंपातील दोन फायर एक्सचेंजर च्या साह्याने शहरातील सतर्क नागरिक,पोलीस प्रशासन,नगर परिषद कर्मचारी,राजकीय व्यक्ती, पत्रकार,विविध सामाजिक संघटनेच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. 


तब्बल तीन तास आगीचे तांडव सुरू होते, दुकानाच्या पाठीमागे नागरी वस्ती आहे सुदैवाने आग इतरत्र पसरले नसल्याने मोठी जीवित हानी टळली, छोट्या व्यवसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले असल्याचे समजते.जवळपास सर्व दुकाने मिळून अंदाजित ४०-५० लाख रुपये नुकसान झाले असल्याचे समजते. व्यवसायिकांनी महावितरणवर ताशेरे ओढत शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असल्याचे सांगितले. १४ महिण्यापासून मुरूम शहरी सहायक अभियंता व ग्रामीण कनिष्ठ अभियंता पदाचा पदभार ११ महिने राजपूत यांच्याकडे होते तर मे महिन्यात राजपूत सेवानिवृत्त झाल्याने ३ महिन्यापासून पदभार हिंगमीरे यांच्याकडे आहे. मात्र अद्याप हिंगमीरे यांनी एकदाही मुरूम शहरास भेट दिली नाही, येथील कर्मचाऱ्यांवर अंकुश नसल्याने मनमानी व भोंगळ कारभार चालू आहे व तसेच विधुत पुरवठा ही सुरळीत चालू नसल्याने होलटेज कमी जास्त होत असल्याने शॉर्ट सर्किट प्रमाण व डीपी उडण्याचे प्रमाण वाढत असल्याचे नागरिकांतून चर्चा केली जात आहे. 

पहाटेच्या सुमारे लागलेल्या आगीमुळे जीवित हानी नाही मात्र ज्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यांना मात्र या संकटाने रस्त्यावर आणले असल्याचे दिसून येत आहे. शासनाने या घटनेची दखल घेऊन त्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. घटनास्थळी नायब तहसीलदार काजळे, मंडळ अधिकारी आमले,  सहायक पोलिस निरीक्षक संदिप दहिफळे आदींनी भेट देऊन पाहणी केली.
 
Top