नळदुर्ग :  टँलेंटो इटंरनॕशल प्ले स्कुलला  माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे पश्चिम विभागाचे प्रदेश अध्यक्ष  संजय बाळा भेगडे यांची भेट

नळदुर्ग, दि. ०१

शहरातील जगतापनगर येथिल टँलेंटो इटंरनॕशल प्ले स्कुलला  माजी राज्य मंत्री , भारतीय जनता पक्षाचे पश्चिम विभागाचे प्रदेश अध्यक्ष  संजय बाळा भेगडे यानी सहकुटूंब भेट देवुन शाळेबद्दल माहिती जाणुन घेतली.

ही  शाळा प्री प्रायमरी असुन सी.बी.सी पँटर्नशी सलंग्न आहे. चार वर्ग भरत आहे. त्यामध्ये  एल के.जी , यु के.जी. नर्सरी असे मिळुन चार वर्गात ४० विद्यार्थी शिकत आहे. यावेळी शाळेची संचालिका नेहा सूर्यकांत राठोड यानी संजय भेगडे यांचे शाल, श्रीफळ देऊन सत्कार  केला.

  याप्रसंगी राठोड यानी शाळेत चालू  शैक्षणिक वर्षांतील आषाढ़ी एकादशी, स्वतंत्रता दिवस, ब्लू डे, व कृष्ण जन्माष्टमी आदी कार्यक्रम  साजरा  केल्याची माहिती देवुन कार्यक्रमाचे फोटोज् व व्हिडिओ दाखविले. यावेळी
संजय भेगडे यानी  कौतुक  करुन समाधान व्यक्त केले.   ग्रामीण भागामध्ये बालकासाठी अधुनिक पद्धतीची शाळा सुरु करण्याचे धाडस  केल्याबद्दल राठोड यांना शुभेच्छा दिल्या. नेहा  राठोड यानी माजी राज्यमंत्री  यानी सहपरिवार भेट दिल्याबद्दल त्यांचे  आभार मानले.
 
Top