नळदुर्ग महाविद्यालयात आरोग्यविषयक कार्यशाळा संपन्न
नळदुर्ग,दि.०१: डॉ. दिपक जगदाळे
कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथे फिट इंडिया मिशनच्या अंतर्गत आणि नविन शैक्षणिक धोरणातील प्रथम वर्षांला असलेला 50 मार्क्सचा एक पेपर हेल्थ आणि वेलनेस अंतर्गत योगा, मिडीटेशन, आरोग्य आणि हेल्थ वेलनेस संदर्भाने एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य सल्लागार संगम वारकरे ( हेल्थ आणि फिटनेस कोच) व सौ.शिवकला देवणे (बुटीशियन आणि हेल्थ आणि फिटनेस कोच) दि. 31 आँगस्ट रोजी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा विभाग आणि वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या माध्यमातून करण्यात आले होते . या कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपन करून झाली. त्यानंतर प्रमुख अतिथिचा सत्कार प्राचार्य डॉ सुभाष राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा डॉ उध्दव भाले यांनी करुन दिला. त्यानंतर सौ. शिवकला देवणे यानी महिलांचे प्रश्न, आहार आणि त्यातून कसे स्वाथ्य चांगले टिकून राहील. बाह्य सौंदर्यापेक्षा आतिल सौंदर्य महत्वाचे आहे यावर मार्गदर्शन केले,
आरोग्य सल्लागार संगम वारकरे यानी फिट इंडिया मिशनचे महत्त्व आणि सकाळचा योगा, वर्क आऊट, मिडीटेशन मुळे दिवसभर कसे रिफ्रेश राहाल आणि आपल्या शरीराची काळजी कशी घ्यावी याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये ६० पेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची BMI ( Boday Mass Index) आणि शरिरातील चरबीचे प्रमाण आदी असे एकूण १४ विविध चाचणीचे मोफत तपासणी करून योग्य तो आहारविषयक सल्ला देण्यात आला. त्यानंतर अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ सुभाष राठोड यानी पार पाडला तर आभार प्रा डॉ अशोक कांबळे यांनी मानले तर सुत्रसंचलन प्रा डॉ निलेश शेरे यांनी केले. या कार्यक्रमास वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.