गुजनूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती  निमित्त आयोजित आरोग्य शिबीरात ६० जणांची तपासणी

वागदरी (एस.के.गायकवाड)


तुळजापूर तालुक्यातील मौजे गुजनूर येथे आरोग्य शिबीरासह‌ विविध उपक्रमाने साहित्य सम्राट लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे यांची जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली असून भव्य मिरवणूकीने जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली.
  

साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे जयंती उत्सव कमिटी गुजनूर व जि.प.प्राथमिक आरोग्य केंद्र नळदुर्ग ता.तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गुजनूर येथे मोफत आरोग्य तपासणी, प्रथमोपचार व आरोग्य सल्ला शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
 

यावेळी जि.प.प्राथमिक आरोग्य केंद्र नळदुर्गच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रद्धा कदम, नेत्र चिकित्सक डॉ.आनंद काटकर,आरोग्य सेविका रमा गोभांळे, छकुली राठोड,आर.एन.पवार,सुरज‌ ढेरे यांनी आरोग्य तपासणीचे काम पाहिले. शेवटी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची गावातून भव्य मिरवणूक काढून जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली.
 
 याप्रसंगी सरपंच फुलचंद वाघमारे,उपसरपंच व्यंकट साळुंखे,जयवंत वाघमारे,कुमार पाटील सविता मुलगे,छमाबाई नागमोडे,सुमन मोरे, प्रगती नागमोडे, भाग्यश्री माने,उत्तम नागमोडे, जिल्हा परिषद शिक्षक भंडारवाड ,अशा कार्यकर्त्या,प्रतिभा वाघमारे,रकमाबाई, वाघमारे,कांचन वाघमारे, मल्लू वाघमारे विलास मोरे ,नामदेव मोरे, सुरेश मुलगे, मंगलबाई साळुंखे, ऋतुजा माने, शांताबाई साळुंखे, सोनीका मोरे, गीता मोरे,औदुंबर पाटील,एकनाथ पाटील, दामू नागमोडे आदीसह  जयंती उत्सव कमिटीचे महादेव मोरे सह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ  उपस्थित होते.
 
Top