नळदुर्ग : अप्पर तहसील मंजूर, मनसेच्या मागणीला यश ; फटाके फोडत,मिठाई वाटप करून मनसेचा जल्लोष
नळदुर्ग,दि.१२
अनेक वर्षापासून नळदुर्ग तालुका निर्मिती व्हावी हि नागरिकांची इच्छा होती,तशी तालुक्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावून धरली आहे. त्याचबरोबर तूर्तास अप्पर तहसील कार्यान्वित करावे अशी भूमिका मनसे पदाधिका-यांनी मांडली होती.
शासनाने गठीत केलेल्या समितीच्या बैठकीत शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी , ग्रामीण विभाग अध्यक्ष गणेश बिराजदार यांनी अहवाल सादर केला होता. तालुक्या संदर्भात 125 पानी सुधारीत अहवाल मुख्यमंत्री यांच्याकडेही पाठविला होता. जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव, जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडेही वारंवार पत्रव्यवहार केला.गेल्या महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे धाराशिव जिल्ह्याच्या दौ-यावर आले असता नळदुर्ग मनसे टीमने त्यांची भेट घेऊन नळदुर्ग तालुका व अप्पर तहसील कार्यालय याबाबत गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी व केलेले आंदोलने यावर चर्चा झाली.
ठाकरे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यंशी बोलतो,असे सांगितले होते,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नळदुर्ग तालुका व अप्पर तहसीलसाठी सतस पाठपुरावा केल्याने शासनाने नळदुर्ग येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर केले.त्यानंतर मनसेच्या पदाधिका-यांनी बसस्थानक परिसरात फटाके फोडून व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला,यावेळी जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,सूरज चव्हाण,शिरीष डुकरे,संदीप वैद्य,यांच्यासह नागरिक उपस्थित होते.