नळदुर्ग अप्पर तहसीलला मंजुरी;
फटाक्यांची आतषबाजीने मिठाई वाटप करत मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा
नळदुर्ग, दि.१२: नवल नाईक
नळदुर्ग अप्पर तहसील कार्यालयास उच्चस्तरीय समितीची मंजुरी मिळाल्याने अनेक वर्षांपासूनच्या मागणीची पूर्तता अखेर महायुती सरकारने केली.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ अर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत नळदुर्ग शहरात फटाक्यांची आतषबाजी करत साखर व मिठाई वाटप करून महायुतीच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी बुधवारी सायंकाळी मोठा जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.
नळदुर्ग येथे अप्पर तहसिल कार्यालय मंजूर झाल्याची माहिती तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सोशल मीडियाव्दारे
दिली. हे वृत्त सर्वत्र समजताच नळदुर्ग शहरातील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी सोशल मिडियावर आ.पाटीलसह महायुती सरकारवर अभिनंदनाचा वर्षाव केला.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चावडी चौकात अर्चनाताई पाटील यांचे आगमन सायंकाळी ७ वाजता झाले. फटाक्यांची अतीषबाजी करत , यावेळी गुलाल उधळत पेढे भरवुन व साखर वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर चौकात, बसस्थानक येथिल संविधान चौकातही अतीषबाजी करण्यात आली.
याप्रसंगी सुशांत भूमकर, श्रमिक पोतदार , नय्यर जागीरदार ,संजय बताले , पद्ममाकर घोडके,
पत्रकार सुहास येडगे, विलास येडगे, शिवाजी नाईक, भगवंत सुरवसे, दादासाहेब बनसोडे, उत्तम बणजगोळे, लढती, शेख, अमर काळे, सुधीर हजारे,गणेश मोरडे, संजय जाधव, सागर हजारे, मुकुंद नाईक, ,सुनील बनसोडे, सुभाष कोरे, विशाल डुकरे ,संतोष पाटील, विजय ठाकूर, गौस कुरेशी, बसवराज धरणे, प्रदीप ग्रामोपाध्ये, शांतनू डुकरे, अक्षय भोई ,शिवसेनेचे (शिंदे गटाचे,) उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके,शिवसेना शहर प्रमुख शिवाजी सुरवसे, उपशहर प्रमुख अफजल कुरेशी, दीपक घोडके, गौसअहमद कुरेशी, खय्युम सुंबेकर, ज्येष्ठ शिवसैनिक बंडू कसेकर आदी उपस्थित होते.