कांबळे परिवाराच्या वतीने शिक्षकांचा सन्मान     

    
मुरुम, ता. उमरगा, दि. ६ 

  येथील जिल्हा परिषद स्पेशल शाळेत विविध शाळेतील शिक्षकांचा कांबळे परिवाराच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (ता. ५) रोजी सत्कार करण्यात आला. 

माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्रा. डॉ. महेश मोटे,
मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे,  सहशिक्षिका सुनिता मिरगाळे, पदवीधर शिक्षक रुपचंद ख्याडे, शिवाजी गायकवाड, रेणुका कुलकर्णी, मंगल कचले, अमर कांबळे केंद्रप्रमुख आबराव कांबळे, मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने, केसरजवळगाचे मुख्याध्यापक बालाजी भोसले, जेकेकुरचे सहशिक्षक संतोष कांबळे, अंगणवाडी सेविका रसवंती कांबळे आदींचा सुनिता कांबळे यांच्या हस्ते शाल, लेखणी व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी कांबळे परिवारातील अजिंक्य मुरूमकर, ज्योती मुरूमकर, ज्योती मुरूमकर, पंचशीला किरात, पार्वती गायकवाड, सुप्रिया कांबळे, राजकुमार कांबळे, अभिजीत कांबळे, गौरव कांबळे, अभिजीत गायकवाड आदींनी पुढाकार घेतला. यावेळी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.            


फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद स्पेशल शाळेत शिक्षकांचा  सन्मानाप्रसंगी
 
Top