वागदरी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी राजकुमार पवार तर उपाध्यक्ष पदी मदन पाटील यांची ग्रामसभेत फेरनिवड
वागदरी, दि.०७ :
तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात विविध विषयांवर ग्रामसभा पार पडली असून या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी राजकुमार रावण पवार तर उपाध्यक्षपदी मदन राजेंद्र पाटील यांची एकमताने फेर निवड करण्यात आली.
गावाच्या प्रथम नागरिक सरपंच सौ.तेजाबाई शिवाजी मिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ग्रामसभा घेण्यात आली.या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करून अनेक ठराव सहमत करण्यात आले.
प्रामुख्याने पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या विषयांवर थोडीफार तणाव पुर्ण चर्चा झाली असून या घरकुल योजनेच्या ऑनलाईन यादीतील लाभार्थीना त्वरित लाभ मिळवून द्यावा, घरकुलाचे काम अर्धवट सोडून देणाऱ्या लाभार्थीना नोटीसा द्याव्यात,या घरकुल योजनेच्या ऑनलाईन यादी पासून वंचित असलेल्या लाभार्थीची यादी करून त्यांची नावे घरकुल यादीत समाविष्ट करण्यात यावी, गावातील अंतर्गत मंजूर सिमेंट रस्त्याचे, समाज मंदिराचे काम त्वरित सुरू करावे, आदी सह विविध विकासात्मक विषयावर चर्चा होऊन ठराव सहमत करण्यात आले.विशेष म्हणजे या ग्रामसभेत तंटामुक्त गाव समिती स्थापन करून अध्यक्षपदी माजी सरपंच राजकुमार पवार तर उपाध्यक्षपदी मदन पाटील यांची फेरनिवड करण्यात आली.यावेळी शासकीय सचिव म्हणून ग्रामसेवक एम.एम.तांबोळी यांनी ग्रामसभेचे कामकाज पाहिले.
या प्रसंगी उपसरपंच सुरेखा भालचंद्र यादव,ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर पाटील,अमोल पवार, मिनाक्षी बिराजदार , जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरुजी, रामचंद्र यादव, रामसिंग परिहार, किशोर धुमाळ सह ग्रामस्थ, महिला,यूवा कार्यकर्ते उपस्थित होते.