स्वच्छता पंधरवडा अंतर्गत महाविद्यालयात नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ्ता मोहीम
नळदुर्ग,दि.21
शहरातील बालाघाट शिक्षण संस्थेच्या कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात स्वच्छता पंधरवडा अंतर्गत महाविद्यालय येथे स्वच्छ्ता मोहीम व प्रतिज्ञा राबवण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे पटांगण , रस्त्याची स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ सुभाष राठोड , प्रा.पाडूरंग पोळे, प्रा.दयानंद भोवाळ , प्रा.पी.जी.गायकवाड आदीसह नळदुर्ग नगरपरिषदचे शहर समन्वयक दस्तगीर जागीरदार, मुकादम वाल्मिक खरावे, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनादूत अविनाश बंजारे, संदेशकुमार आखाडे, प्रथम बनसोडे, न.प. कर्मचारी अमित गायकवाड, बापू झेंडारे ,अश्वजीत दूरुगकर, सुनील कांबळे,सविता गायकवाड, नगरपरिषद सफाई कर्मचारी भाग्यश्री रणे, मनीषा साबळे, कुसुम बागडे, मीनाक्षी भालेराव, सुरेखा भालेराव, सुनंदा मस्के आदी सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनी मिळून सर्व महाविद्यालयीन परिसर स्वच्छ करून स्वच्छता शपथ घेतली.