शिवसेना (उबाठा) पक्षाकडून इच्छुक असलेले उमेदवार प्रा. ॲड. पांडुरंग पोळे यांनी घेतली उपोषणकर्ते विनायकराव पाटील
उमरगा, दि.22
मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी उमरगा तालुक्यातील कवठा येथे सहकारमहर्षी तथा सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील हे दि.17 सप्टेंबर पासुन आमरण उपोषणाला बसले आहेत. शनिवार रोजी
उमरगा लोहारा विधानसभा मतदार संघातून
शिवसेना (उबाठा) पक्षाकडून इच्छुक असलेले उमेदवार प्रा. ॲड. पांडुरंग पोळे यांनी उपोषणकर्ते विनायकराव पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
हैदराबाद संस्थानातील गॅझेट विचारात घेता महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणात राज्यघटनेच्या 171 व्या कलमाप्रमाणे दुरुस्ती करून सुधारित आदेश काढणे न्यायाचे आहे असे ते म्हणाले.
साधुतूल्य असलेल्या वयोवृद्ध विनायक रावजी पाटील हे न्यायापासून वंचित असलेल्या मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आमरण उपोषणाला बसले असून आज पाचवा दिवस आहे.
शासनाने मनोज (दादा) जरांगे पाटील व त्यांना समर्थन देणाऱ्या सर्व नेते, कार्यकर्ते, समाजबांधव यांच्या मागणीची दखल घेऊन तात्काळ न्याय द्यावे.
यावेळी प्रा. ॲड पांडुरंग पोळे , शिवाजी नाईक, नितेश जाधव, सुनिल पवार आदीसह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.