शहीद जवान बचित्तरसिंग यांचे  राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्या  कामास लवकरच सुरुवात

मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचा मुक साक्षीदार - नळदुर्ग येथील "आलियाबाद पुलाचे आमदार राणाजगजितसिंह पाटिल यांच्या हस्ते पूजन 

नळदुर्ग,दि.१७ : नवल नाईक 

 इतिहासाचा साक्षीदार असलेल्या नळदुर्गच्या  ऐतिहासिक आलियाबाद पुलाला राष्ट्रीय स्मारकाच्या दर्जासाठी आणि देशाचे पहिले अशोक चक्र पुरस्कार प्राप्त शहीद जवान बचित्तरसिंग यांचे येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी  यांच्या आदेशाने जागेची मोजणी करुन जागा  हस्तांतरित करण्याची होवून कामास सुरुवात होणार असल्याचे आश्वासन भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले.


नळदुर्ग येथील महामार्गावरील आलियाबाद पुलाचे मराठवाडा मुक्ती संग्रामात मोठे योगदान आहे. या पुलाचे व शहीद जवान बचित्तरसिंग यांच्या प्रतिमेचे पुजन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते  दि.१७ सप्टेंबर रोजी करण्यात आले.

भारतीय सेना आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी निजामाने आलियाबाद हा पूल उडवून देण्यासाठी पुलाखाली दारुगोळा ठेवला होता. मात्र भारतीय सेनेतील जवान बचित्तरसिंग यांनी तो दारूगोळा नष्ट केला. यात जखमी होऊन ते शहीद झाले. या शौर्याची दखल घेऊन त्यांना देशातील पहिले अशोक चक्र प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले.

 येणाऱ्या पिढीसाठी माहितीसाठी या स्मारकात "मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी" यांच्या छायाचित्रासह त्यांच्या कार्याची माहिती ठेवण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास नायब तहसीलदार संतोष पाटील, भाजपचे सुशांत भूमकर,  माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तांडा सुधार कमिटीचे विलास राठोड, भाजयुमोचे राजसिंहा निबाळकर, सरचिटणीस श्रमिक पोतदार, नळदुर्ग शहराध्यक्ष धीमाजी घुगे, माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके, सुनील बनसोडे, सुनील चौधरी, गणेश मोरडे, मुद्दसर शेख, अजय दासकर, संजय विठ्ठल जाधव, रणजितसिंह ठाकूर, अक्षय भोई, तलाठी विश्वास वायचाळ, मंडळ अधिकारी पवन भोकरे,गौस शेख, शरद देशमुख, एस.के. बागवान, गौस शेख, एस के बागवान, शरद देशमुख, रियाज शेख , गणेश नन्नवरे,अबुलहसन रजवी, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
 
Top