सोलापूर हैद्राबाद महामार्गावर बस उलटून झालेल्या अपघातात ११जखमी
नळदुर्ग दि.२४
महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशीही
एस.टी.बस पलटी होऊन झालेल्या अपघातात ११ प्रवासी जखमी झाल्याची घटना सोलापूर हैद्राबाद महामार्गावरील फुलवाडी टोलनाक्याच्या परिसरात असलेल्या तलावावरील पुलात मंगळवारी दुपारी दोन वाजता घडली. सांगोला - हैद्राबाद एस.टी.बस क्र. एम.एच.१३-सी.यू.७९५१ ही अपघातग्रस्त बस आहे.
मुर्टापाटी जवळ बस अपघाताची घटना ताजी असतानाच हा दुसरा आपघात घडला आहे.
या अपघातातील जखमी प्रवासी पुढीलप्रमाणे आहेत.
जिजाबाई पांढरे शहापूर,अनील कंदम दहिटणा,नंदा काळे जळकोट (सर्व ता.तुळजापूर),प्रशांत अंबाळे लाड चिचोली,नारायण शेंडगे,शेखर स्वामी,खाजाबी उरचणे मुरुम,मधुकर बिद्री (सर्व रा.उमरगा),लक्ष्मण खडके बोरामणी (जि.सोलापूर),संतोष साबळे तिंत्रज ( ता.भूम) व वाहक सुजय बांगर सांगोला.जखमींना नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. अविनाश भोरे,वैद्यकीय आधिक्षक डॉ. ईस्माइल मुल्ला व त्यांच्या पथकाने उपचार केले आहे.
सांगोला -हैद्राबाद या एस.टी. बसच्या पुढे जाणाऱ्या वाहनाने अचानक दिशा बदलल्यामुळे मागून जाणारी बस कडेला घेताना तलावाच्या कडेला पलटी होऊन अपघात घडला. या अपघातात ११ प्रवासी जखमी झाले असुन एका प्रवाशाला सोलापूरला पाठविण्यात आले आहे.
सांगोल्याहून हैद्राबादच्या दिशेने जाणारी बस केरुर ता.तुळजापूर येथील पळस निलेगाव प्रकल्पाच्या पुलावरुन मंगळवारी दुपारी २च्या सुमारास घसरुन पलटी झाली आहे.त्यामध्ये ११ प्रवासी जखमी झाले आहेत. बसमध्ये २१ प्रवासी प्रवास करीत होते.समोरुन जाणाऱ्या आयशर टेंपोने अचानक दिशा बदलली त्यामुळे बस कडेला घेताना पलटी झाल्याचे बस चालक चैतन्य वरगर यांनी सांगितले.
रस्ता नवा परंतू अनेक ठिकाणी जून्याच पुलांचा वापर सुरु आहे. पुलाचा कठडा जिर्ण झाल्याने तो तोडून बस तलावाच्या काठावर पलटली. अपघाताच्या ठिकाणी झाड असल्याने त्या झाडाला बस अडकली , अंदाजे वीस फुट खोल पाण्यात बस जाण्यापासून थांबल्याने २३ जणांचे प्राण वाचले आहेत.
झाडाला न अडकता आणखी पाच फुट बस पुढे असलेल्या वीस फुट खोल पाण्यात कोसळली असती तर २१ जणांना जलसमाधी मिळाली असती.केवळ बाभळीच्या झाडामुळे आम्ही वाचल्याचे अपघातातील जखमी मधुकर बिद्री सांगितले.
महामार्ग बनला धोकादायक
एकाच ठिकाणाहून अवजड वाहने गेल्याने अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे.त्यामुळे वाहनांना लेन बदलताना कसरत करावी लागते.शिवाय पावसाने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत ते बुजविण्याची मागणी वाहन चालकांतून होत आहे.