नळदुर्ग: उपजिल्हा रुग्णालयात आयोजित आरोग्य शिबिरात १३५ रुग्णांची तपासणी करुन मोफत औषधोपचार
नळदुर्ग,दि.२४:
राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत अंतर्गत मंगळवार दि.२४ सप्टेंबर रोजी नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित आरोग्य शिबिरात विनामूल्य 135 रुग्णांची मोफत तपासणी करून मोफत औषध उपचार करण्यात आले.
शहरातील उपजिल्हा रुग्णालयात सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आरोग्य शिबिर पार पडले.
डॉ. विलास बोरसे, डॉ. सुवर्णा चौधरी, उमेश अगावणे, मयूर देशमुख ,प्रवीण कोपार्डे, शुभांगी चव्हाण, श्रीधर इंगळे, पूनम ठाकरे, भाग्यश्री वाघ, वैभव मस्के, मोहित भोपळीकर, अभिषेक चदरे,नितेश महाजन, अक्षय रसाळ आदी धाराशिव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील वैद्यकीय तज्ञांनी रुग्णांची तपासणी करुण औषधोपचार केले. तर डॉ आनंद काटकर यांनी डोळे तपासणी केली.
याप्रसंगी माजी नगरसेवक नय्यर जहागीरदार, माजी नगरसेवक संजय बताले, नळदुर्ग शहर अध्यक्ष धिमाजी घुगे, शिवाजी नाईक,रियाज शेख ,रणजितसिंह ठाकुर, अबुलहसन रजवी , परिचारिका सुमन फुले आदीसह कार्यकर्ते वैद्यकीय पथक, परिचारिका, कर्मचारी रुग्ण उपस्थित होते.