वैद्यकीय अभ्यासक्रमला अनिकेत बिराजदार यास प्रवेश मिळाल्याने वागदरी ग्रामपंचायतीच्या वतीने गौरव
वागदरी ,दि.२४:
अत्यंत साधी राहणी व सरळ विचारसरणी असलेले आणि सन २००४ पासून एस.टी महामंडळात अत्यंत इमानदारीने चालक म्हणून कार्यरत असलेले संजय नरसिंह बिराजदार यांचे चिरंजीव अनिकेत संजय बिराजदार यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ऑल इंडिया रँक मधून गुलबर्गा येथे BAMS वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमला प्रवेश घेतल्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायत कार्यालय वागदरी ता.तुळजापूरच्या वतीने सरपंच तेजाबाई शिवाजी मिटकर यांच्या हस्ते सत्कार करुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी उपसरपंच सुरेखा भालचंद्र यादव,ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर पाटील, गुणाबाई बनसोडे,जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरुजी,ह.भ.प.सुरेशसिंग परिहार, राजकुमार पाटील, महादेव बिराजदार,किशोर सूरवसे, जितेंद्र पाटील,संजय बिराजदार,एस.के.गायकवाड, किशोर धुमाळ,सुधाकर बिराजदारसह ग्रामस्थ उपस्थित होते.