बटरी ऑपरेटेड फवारणी पंप नळदुर्ग, अणदुर कृषी मंडळ अंतर्गत ६२ गावातील ६९५ शेतकऱ्यांना वाटप


नळदुर्ग, दि.१४
बटरी ऑपरेटेड फवारणी पंप (MAHADBT) योजनांतर्गत लॉटरीव्दारे सोडत जाहीर झालेल्या लाभार्थीना मंडळ कृषी अधिकारी कार्यालय नळदुर्ग, अणदुर  अंतर्गत येणाऱ्या ६२ गावातील ६९५ शेतकऱ्यांना शुक्रवार दि.१३ सप्टेंबर रोजी वाटप करण्यात आले.


यामध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना तुळजापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे प्रमुख अवधूत मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी मंडळ नळदुर्ग कार्यालयांतर्गत  येणाऱ्या येडोळ, वागदरी, गुजनूर, निलेगाव, कुणसावळी,किलज,सिंधगाव,देवसिंगा,हंगरगा (नळ) आदिसह ३३ गावातील ३९४ लाभार्थी शेतकऱ्यांना  बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपांचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी नळदुर्ग मंडळ कृषि अधिकारी श्रीमती. डि डि सरवदे, कृषि पर्यवेक्षक डि.पी बिराजदार, आर एम पवार, कृषि सहाय्यक योगेश क्षिरसागर, जी एस कांबळे, आर एन मते, एस आर माने, रणदिवे, बनसोडे, होळकर, लाभार्थी शेतकरी प्रशांत मारेकर, इंदुबाई वाघमारे, व्यंकटेश नाईक, रामसिंग परिहार, सुनिल चौधरी, विरपक्ष गोगावे, निर्मला गुड्डे, सागर चौगुले, यासह परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

अणदूर ता.तुळजापूर येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने बॅटरी चलीत फवारणी पंपाचे मोफत वाटप  दि,१३ रोजी करण्यात आले. राज्य पुरस्कृत कापूस सोयाबीन व तेलबिया पीक उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विशेष कृती योजना अंतर्गत कृषी विभाग तुळजापूर  कृषी अधिकारी अणदुर या कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 29 गावांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन  पद्धतीने  नोंदणी केली होती. त्यांची लकी ड्रॉ मार्फत निवड करण्यात आली. त्यामध्ये ३०१ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांना अणदुर येथील कार्यालयामधून पंपाचे मोफत वाटप करण्यात आले .

 
Top