न्यू चैतन्य गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम,खास मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
नळदुर्ग,दि.10
येथील न्यू चैतन्य तरुण गणेश मंडळाने या वर्षी श्रीगणेशोत्सवानिमित्त खास मुलींसाठी दि-14 व 15 सप्टेंबर,वार-शनिवार,व रविवार रोजी दुपारी 4 ते 6 यावेळेत,दोन दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे,
या शिबिरासाठी प्रमुख उपस्थितीत नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहा.पो.नि.गजेंद्र सरोदे,तसेच शिबिरात समुपदेशन श्री.श्री.गुरुकुल अणदूर सह.शिक्षिका सौ.मंजुषा जितेंद्र मोरखंडीकर हे करणार आहेत, स्वसंरक्षणाचे प्रशिक्षक म्हणुन आंतरराष्ट्रीय कराटे खेळाडू,सुवर्णपदक विजेती कु.प्रणिता मोहन पवार असणार आहे,त्यामुळे या प्रशिक्षण शिबीरामध्ये जास्तीत जास्त मुलींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन न्यू चैतन्य तरुण गणेश मंडळाने केले आहे.