तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार- धीरज पाटील; निष्ठावंत कार्यकर्ता मेळावा संपन्न
नळदुर्ग,दि.३०
येत्या निवडणुकीत तुळजापूर विधानसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित विजयी होणार असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांनी व्यक्त केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तुळजापूर मतदार संघातील नळदुर्ग शहर व या भागातील जिल्हा परिषद गट शहापूर, अणदुर,नदंगाव,जळकोट येथील
महाविकास आघाडीच्या निष्ठावंत कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वानी एकजुटीने काम करून तुळजापूर विधानसभा मतदारसंघात विजय मिळवून भाजपला हद्दपार करण्याचे अनेकांनी बोलताना सांगितले.
माजी नगराध्यक्ष मकरंद निंबाळकर,सरपंच रामचंद्र आलुरे, शिवसेनेचे कमलाकर चव्हाण, राजअहमद पठाण, सरदारसिंग ठाकूर, मेजर राजेंद्र जाधव, संतोष पुदाले,राष्ट्रवादीचे महबूब शेख ,बशीर शेख माजी नगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी, हरीश जाधव, डॉ. जितेंद्र कानडे, शरद जगदाळे, कृष्णात मोरे, संजय मोरे, अमोल पाटील, समीर सुरवसे आदीसह नळदुर्ग भागातील जिल्हा परिषद गटाच्या विविध गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महाआघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यास माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व त्यांचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित नव्हते.याविषयी उपस्थित कार्यकर्त्यात चर्चा रंगली होती.