जगातील सर्वोत्तम दोन टक्के शास्त्रज्ञामध्ये अणदुरच्या सुपुत्राचा समावेश.. अभिनंदनाचा वर्षाव

तुळजापूर,दि.३०:

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जवाहर विद्यालयाचे विद्यार्थी तथा जीवशास्त्र विषयाचे गाढे अभ्यासाक  निवृत्त शिक्षक नवनाथ सगशेट्टी गुरुजी यांचे सुपुत्र, अणदूर भूषण डॉ. जयप्रकाश सगशेट्टी यांची सलग सहाव्यांदा आंतरराष्ट्रीय पातळीवरील अमेरिकेतील प्रसिद्ध स्टॅन्ड फोर्ड विद्यापीठ निवड करण्यात आली आहे. 

या नवडीबद्दल त्यांचे सर्वत्र  अभिनंदन केले जात आहे.
मराठवाडा विद्यापीठासह कार्यक्षेत्रातील नऊ प्राध्यापकांचा 2024 च्या यादीमध्ये समाविष्ट झाला आहे. डॉ. जयप्रकाश हे वाय बी चव्हाण फार्मसी महाविद्यालय संभाजीनगर येथे कार्यरत असून त्यांच्या या यशस्वी कार्याबद्दल ग्रामस्थाचाकडून अभिनंदन करुन  कौतुक केले जात आहे. डॉ. जयप्रकाश यांचे जय मल्हार पत्रकार संघ, खडकाळी ग्रुप, 8 फार्मा यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
 
Top