विरमाता शांताबाई बनसोडे यांचे दु:खद निधन
नळदुर्ग,दि.३०
मरणोत्तर किर्ती चक्र विजेते शहीद वीर माजी सैनिक यशवंत मारूती बनसोडे यांच्या मातोश्री शांताबाई मारुती बनसोडे रा.बौध्द नगर नळदुर्ग यांचे आज दि.२९/०९/२०२४ रोजी दुपारी ठिक ४.०० वा.दरम्यान वृध्दापकाळी वयाच्या ८१ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.त्यांच्या पश्चात एक मुलगा,सुना, नातवंडे असा परिवार आहे.
उद्या दि.३०/०९/२०२४ रोजी सकाळी ठिक १०.३० वा.दरम्यान त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.