नळदुर्ग शहर पथ विक्रेता (नगरपरिषद अंतर्गत) समिती सार्वत्रिक निवडणूकीत ८ उमेदवारांची बिनविरोध निवड
नळदुर्ग, दि.११
नळदुर्ग शहर पथ विक्रेता (नगरपरिषद अंतर्गत) समिती सार्वत्रिक निवडणूकीत महाराष्ट्र पथ विक्रेता उपजीविका समितीच्या ८ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात
निवडणूक कार्यक्रम नुसार दि ३ ते ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते ५ या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करणे करिता अवधी देण्यात आला. या कालावधीमध्ये एकूण १० नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले. त्याची दि. ०५ सप्टेंबर रोजी छाननी करण्यात आली, त्यात वैध नामनिर्देशन पत्राची यादी दि. ०५/०९/२०२४ वेळ ३. वाजता कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली. सदर अर्जावर आक्षेप अर्ज स्वीकारणे करिता व येणाऱ्या आक्षेपावर निराकरण करण्यासाठी दि.०६ पर्यंत घेण्यात आले होते. परंतु या कालावधीत कोणतेही हरकती प्राप्त झाल्या नाहीत. नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी दिनांक ०९/०९/२०२४ सायंकाळी ३. पर्यंत वेळ देण्यात आले, त्यानुसार ०३ नामनिर्देशन पत्र अर्जदार यांनी माघार घेतले. दि. १० रोजी मुख्याधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले.
बिनविरोध निवड झालेल्या प्रवर्ग निहाय उमेदवार जाहीर करून प्रमाणपत्र वितरण मंगळवारी दि. १०/०९/२०२४ रोजी केले .
प्रवर्ग निहाय उमेदवार पुढील प्रमाणे आहेत. पुष्पाबाई प्रभाकर कांबळे अनुसूचित जाती महिला, गौस अहमद नौशादसाब कुरेशी- इतर मागासवर्ग, इम्रान आज मका पठाण-अल्पसंख्या, कांबळे ताई मोहन विकलांग महिला फातिमा गौस कुरेशी सर्वसाधारण (महिला राखीव एक) वसीम अहमद हुसेन कुरेशी सर्वसाधारण तय्यब बागवान सर्वसाधारण या सर्व विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या
सदर प्रक्रियेसाठी नगर परिषदेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुरज गायकवाड यांनी सहाय्य केले. तसेच शहरातील माजी नगराध्यक्ष नगरसेवक प्रतिष्ठित नागरिक हे उपस्थित होते.
शिवसेनेचे (शिंदे गटाचे) सदस्यपदी गौसअहमद नौशादसाब कुरेशी यांची बिनविरोध निवड होताच नळदुर्ग शहर शिवसेना व धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या वतीने सत्कार करुन अभिनंदन करतांना ज्ञानेश्वर घोडके , बंडू कसेकर व ईतर