पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या हस्ते
अंजनी प्रशालेत ३२ व्या व्याख्यानमालेचे शुभारंभ 

नळदुर्ग,दि.११

शहरातील अंजनी प्रशालेत ३२ व्या व्याख्यानमालेचे उदघाटन पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या हस्ते करण्यात आले, गेल्या ३२ वर्षापासून अंजनी प्रशालेमध्ये गणेशोत्सव निमीत्त व्याख्यानमालेचे आयोजन केले जात आहे. 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुभद्रा बलभीमराव मुळे, महीला दक्षता समीतीच्या सदस्या सौ. कल्पना गायकवाड, सौ.रेणुका शिवाजी मुदगडे आदी उपस्थीत होत्या. यावेळी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प महीला दक्षता समीतीच्या सदस्या सौ. कस्तुरा मल्लीकार्जून कारभारी यांनी गुंफले असून त्यांनी आपल्या बहीणीला वाचवा या विषयावर सखोल असे मार्गदर्शन त्यांनी केले. 


यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे म्हणाले की, मुलींनी खंभीर बनले पाहिजे बनुन आपले मत मांडले पाहीजे, वागण्यातून बोलण्यातून मुलींनी चिकाटीने आभ्यास करुन आपले ध्येय गाठले पाहीजे असे सांगितले.

 याप्रसंगी  सौ. कल्पना गायकवाड, सौ. सुभद्राताई मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विदया ठोकळ यांनी  तर सुत्रसंचालन जितेंद्र मोरखंडीकर यांनी केले. आभार जयवंत मुळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढाकार घेतले.
 
Top